︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.


Ongoing Work

I have been stalking private profiles of the people from the village I grew up in and stealing pictures from their social media profiles to put together the visual memories of the places and streets I strongly associate my nostalgia with. It has been almost two decades since I left the village, and now suddenly I find myself busy looking for the unchanged and old structures in these photographs to trace over and massage my visual memories. The digital boom with democratic access to internet and mobiles phones has really changed ways of creation and accessibility of digital participation in the most remote places. Paradoxically, I don't find myself surprised by the ageing structures among the other modernized things cropping up around them. But now that I have almost doubled in height, I find myself in the awe of my changed sense of scale around these now minimized structures even if I have always anticipated this awe. Also, the act of creating an accessible record of nostalgia often releases one from the very burden of maintaining the memory that one attempts to record. Now that I have found/curated an external record of my visual memories, I don't seem to remember these places with the same old vividness.

But again, my sense of nostalgia or the act of tracing the visual memories is not really the principal motivation for curating these memories this way. My very act of stalking and stealing these pictures is what I intend to introspect here. Getting to the root of the awkwardness with these people from the past and to the function and mechanism of this awkwardness is what I intend to articulate at the end of this project. Growing up in the village where my birth in a lower caste was very well cancelled by my birth in a relatively upper class. And throughout the last two decades, the obvious growth in both our caste awareness and caste supremacy in our online presence has created a stressful awkwardness now. The interclass awkwardness is now also multiplied by the intercaste stress. It's a lot more convenient for me to simply steal these photographs from the personal social media accounts of these people without ever bothering to reenact the old childhood relationships in the new times of actualized polarities. A lot of possibilities of the reconnection are being cropped out along with the people in these photographs, and it feels like a loss nonetheless. 

चालूए काम

ज्या गावात तेव्हा लहानाचा (अर्ध) लंबू झालो, आता त्या गावातील लोकांच्या इंटरनेटवर पसरलेल्या प्रोफायली इथे चुपचाप बसून चाळून चाळून काटून छाटून जुन्या आठवणींचा हा गळका चित्रपट मांडू पाहतोय. कमीत कमीत वीस वर्षे झाली असावीत गाव सोडून, पण आता अचानक जुन्या तशाच राहिलेल्या भिंतींत, झाडांत आणि रस्त्यांत आता गाळून राहिलेल्या गतकाळातील आठवणींना कुरवाळण्याचा बहाणा शोधतोय ह्या लोकांच्या चोरून ठेऊन घेतलेल्या फोटोंमधून. आता एकूणच डिजिटल क्रांतीमुळे कोपऱ्याकोपऱ्यात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे आणि त्याने डिजिटल सहभाग आणि डिजिटल निर्मितीचं लोकशाहीकरण होतंय. तरीपण वार्धक्यात कलत चाललेल्या माझ्या ओळखीच्या ह्या दगड विटांच्या फोटोंमध्ये भोवतीने फुटणाऱ्या नवीन गोष्टींचं तसं तेवढं नवल राहिलं नाही. पण आता स्वतःच्या उंचीचा पूर्ण ईडलंबू झाल्यानंतर ह्या फोटोंतील वास्तूंच्या आकाराच्या नवीनच जाणवलेल्या खुजेपणाच नवल अंदाज असूनही बदललं नाही. आता पुन्हा पुन्हा जाऊन बघत राहण्यासाठी बांधत असलेल्या ह्या फोटोंच्या तुकड्यांतुन जुन्या आठवणींचं डोक्यात पाळून ठेवलेलं ओझं आता इथे हलकं होऊन डोक्याबाहेर राहायला जात आहे. ह्या सगळ्या आठवणी इथल्या सज्ज्यावर मांडून आणि रचून पूर्ण होत नाहीत तोच जुन्या आठवणींचा ठळकपणा विरायला सुरुवातहि झाली आहे.




खरं सांगायचं तर जुन्या आठवणी कुरुवाळत बसने हा ह्या खटाटोपाचा प्राथमिक उद्देश नाहीये तसा. गावातील कित्येक लोकांच्या प्रोफायली हुंदाडत त्यातून त्या जुन्या आठवणींचा संदर्भ चोरून स्वतःसाठी ठेऊन घेणे ह्या मला जडलेल्या नवीन छंदाला जन्म देणाऱ्या ऑकवर्डनेसला तपासून पाहण्याचा हेतू ह्यात आहे. ह्या जोडवहीच्या शेवटी गावातील तेव्हाच्या लोकांशी आज असलेल्या माझ्या ह्या ऑकवर्डनेसच्या मुळाशी, त्या ऑकवर्डपणाच्या चालीरीतीशी पोहोचून त्याचा पूर्ण अर्थ लावण्याची हि धडपड आहे. गावात खालच्या जातीतील माझा जन्म आणि तुलनेने वरच्या वर्गातील माझे स्थान बऱ्याच अर्थी त्या वयात तेव्हा परस्परविरोधी ठरले. पण वीस वर्षांच्या आयुष्यानंतर एकूणच सामाजिक जात-जाणिवा आणि राजकीय जात-वर्चस्ववाद ह्यां दोहोंचा इंटरनेटवर फोफावलेला पसारा ह्या तणावपूर्ण ऑकवर्डनेसच्या मुळाशी आहे. आंतरवर्गीय ऑकवर्डनेस आणि आंतरजातीय ताण ह्यांच्या गुणाकारातून घडलेलं भावनिक गणित इथे उकलू पाहत आहे. हे फोटोज चुपचाप चोरून ठेऊन घेण्यातला सोयिस्करपणा बरा वाटतो, बालपणीच्या बाळबोध आठवणींना आज इथे वास्तवातल्या जहाल वर्चस्ववादात मोकळ्या करण्याचा धोका अनुभवण्यापेक्षा. तरीही इंटरनेटच्या निमित्ताने पुन्हा बंध जुळून येण्याचा योग ह्या फोटोंत लोकांप्रमाणेच डोळे बारीक करून कापला जात आहे, आणि तेही टोचल्यावाचून राहत नाही.




































































































































































































































































March 2021 - Ongoing