︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.

Lunchboxes in the age of Mechanical Reproduction





//
I wish I could do all. Work, cook, sleep and express here. In a way, I did manage to do it all, but not without the grinding negotiations between these acts. Throughout this course, I was constantly thinking about Julio Garcia Espinosa’s appeal to unify a common worker and a folk artist. But the juggling within the capitalistic definition of efficiency and productivity often comes in the way of one’s process of humanizing oneself. I see the current times have a casteist and feudalistic approach to outsource our activities of self-care while at the same time, encourage the dehumanizing and repetitive mechanization of the self who is also in civil war with the AI powered bots. So, within my own private little abode, I started to cook myself full meals and pack my lunchboxes as an act of self-care in my performative and yet functional protest.

But my lunchboxes and my emotionalities aren't really divorced from that same repetition and mechanization. The hand-drawn screenshots of the conversations here are sucked back into this very digital screen ultimately. Our protests are also in osmosis with the protested. And our intimacies have a trauma bond with the inactivity. Yet the process of humanization of the self did not turn around yet and it keeps seeking more and more nuances.

//
असं वाटतं कि सगळंच करावं आपण. दिवसभरात ऑफिसला जावं, स्वैपाकही करावा, झोप पूर्ण घ्यावी आणि इथे पुरेसं व्यक्तदेखील व्हावं. तसं पाहिलं तर ते सगळं करता पण आलंय मला, परंतु खूप घासाघीस करावी लागली त्यासाठी ह्या सगळ्यांमध्ये. एक सामान्य मजूर आणि एक लोककलाकार ह्यांच्या आत्म्यांचं एकीकरण ज्युलिओ गार्सिया एस्पिनोवाने कल्पलेलं, त्याची आठवण होत राहायची. परंतु माणसावर चिटकवलेल्या कार्यक्षमता आणि उत्पादकता अशा भांडवलशाहीच्या फूटपट्ट्या मात्र त्याच्या माणूसपणावर भोकं पाडू पाहतात. पण आजच्या भांडवली शहरजीवनात स्वतःच्या स्वतःच करायच्या कित्येक गोष्टींना पुन्हा जातीय आणि सामंती पद्धतीने इतर चाकर लागतात, म्हणजे तुम्हालाही पुढे दुसरी चाकरी करण्यासाठी अधिक सवड आणि मोकळीक लाभते. ह्याही चाकऱ्यांमध्ये माणूसपण कुरतडणारी यांत्रिकता फोफावत राहते, जणू काही ए आय वर चालणारे यंत्र आणि माणूस ह्यांच्यांत भविष्यावरुन एक स्पर्धा आणि यादवी माजलेली आहे. तेव्हा माझ्यातल्या माणूसपणाला जिवंतपणा पाजत राहण्यासाठी आणि स्वतःच्या काळजीकरीता इतरांना जुंपण्याऐवजी मी आपल्या छोट्याशा घरात, स्वतःच स्वतःचा रोज स्वैपाक करून, माझे डबे बांधून ऑफिसला जायला लागलो. आणि ह्याला मी माझा स्वतःचा छोटेखानी, नाटकी परंतु तरीही यशस्वी असा निजी निषेध समजतो इथल्या भांडवली शहरजीवनाविरुद्ध.

पण कितीही म्हंटल तरी माझे रोजचे जेवणाचे डबे आणि पर्यायाने त्यात गुंतलेली माझी भावनिकता, ह्यांचातही तोचतोचपणा आणि तीच यांत्रिकता झिरपायला लागली. जसं काही आत्मीतयतेने हाताने कागदावर उतरवून काढलेले हे स्वतःच्या लोकांबरोबर केलेले डिजिटल संवाद पुन्हा ह्याच स्क्रीनवर डिजिटल बनवूनच वाचता आले. तसेच आपले निषेधही परत आल्या वाटेने निषेधार्यांमध्ये विरघळून जाऊ लागतात. आपली आत्मीयता आणि आपली निष्क्रियता ह्यांच्यात विषयुक्त बंधन तयार झाले आहे. तरीही माणसाचे माणूसपण अशा वरवर फसलेल्या निषेधाच्या पलीकडे पोहोचवण्यासाठी अजून अजून डोक्याचा किस पाडत राहू म्हणतो.



May 2021 - December 2021