︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.







Over 1.44 lakh cases of atrocities against Scheduled Castes and 23,408 cases of atrocities against Scheduled Tribes came for trial before the judiciary in 2016, as per the last available data from the National Crime Records Bureau. Of this, almost 90% of the cases filed under the SC/ST Act languish at the end of each year, and when they do manage to complete trial — on an average five years later — a majority of them end in acquittals.

राष्‍ट्रीय अपराध रिकार्ड ब्‍यूरोच्या अद्ययावत माहितीनुसार २०१६ मध्ये १.४४ लाखांपेक्षा जास्त अनुसूचित जातींविरोधी अट्रोसिटीच्या केसेस आणि २३,४०८ अनुसूचित जमातींविरोधी अट्रोसिटीच्या केसेस कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या. ह्या पैकी सुमारे ९०% केसेस ज्या अ.जा./अ.ज.कायद्यान्वये दाखल केलेल्या असतात त्या वर्षभरातच अर्ध्यात थंडावतात आणि ज्या ज्या सुनावणी पूर्ण करतात- त्यांचा सरासरी कालावधी सुमारे पाच वर्ष असतो - त्या बहुतेक सर्व दोषमुक्त म्हणून निकाली निघतात.

//





Jayesh. A twenty-one-year-old Dalit youth who was doing a part-time job in Vadodara as a security guard. Returned back to his home, in Bhadraniya Village, situated 50 km from Vadodara after his day’s job.

जयेश सोळंकी. एकवीस वर्षांचा दलित युवक जो वडोदऱ्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून अर्धवेळ नोकरी करायचा, आपले काम संपल्यानंतर नित्यक्रमाने वडोदऱ्यापासून ५० किमी स्थित भदरनिया नावाच्या गावी आपल्या राहत्या घरी परतला.


Prakash is his cousin who was slapped by Sanjay Patel for watching the garba event. Jayesh, who was accompanying him, firmly tried saving Prakash and gave a firm reply to Sanjay that they are here just like them to watch the garba.
प्रकाश, जयेशचा चुलतभाऊ, गरबा नाच बघतो म्हणून ज्याच्या कानशिलात दिली होती संजय पटेलने. जयेश, जो प्रकाश बरोबरच होता, ठामपणे प्रकाशला वाचविण्याच्या प्रयत्नात होता आणि संजयला ठाम सांगितले कि ते त्याच्याप्रमाणेच इथे गरबा बघण्यासाठी आलेले आहेत.

Sanjay who probably did not like Jayesh’s firm reply. He hurled few more abuses and left. Only to come back with more people, all belonging to the Patel community and to start a fight with the Solankies. Jayesh was thrashed and his head was banged against a wall. He was declared dead when he was brought to the hospital.
संजयला कदाचित जयेशच ठाम उत्तर झोंबलं. त्याने अजून काही शिव्या हासडल्या आणि निघून गेला. पण आणखी काही माणसांबरोबर परतण्यासाठीच. सोळंक्यांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आलेले संजयबरोबरचे ते सर्व लोक पटेल समाजातील होते. जयेशला तुडवण्यात आलं आणि त्याचं डोकं भिंतीला धडकलं गेलं. दवाखान्यात आणल्यानंतर संजयला मृत घोषित केलं गेलं.

Bhailalal and Madhuben Solanki are Jayesh’s parents. They received (5 acres?) land and (4 lacks and 8 lacks) money as a help to continue their lives. Bhailal and Madhuben both are devastated by their son’s death and emotional fragility keeps them bringing back to the guilt of not stopping their son from attending the garba event that night. At no place, they find any sense in blaming his murder at the excessive caste pride Patel’s carry,; let alone the caste system at place. (Confirm.) This thinking brings the onus back on themselves for not stopping him from attending the garba event on that day. They not only carry the enormous void their son left, but also the self-reproach for not having him stopped that night. The caste system is rooted so deep and into the veins, that the possibility and hope for uprooting the system do not occur. A social structure without the casteist boundaries is generally kept out of the imagination. So, instead, the existing system is accepted and one is supposed to settle in the safest place.
भाईलाल आणि मधुबेन सोळंकी, जयेशचे आईवडील. त्यांना मदत म्हणून ५ एकर जमीन आणि काही (४ लाख आणि ८ लाख रुपये) पैसे मिळाले, आपले पुढील आयुष्य चालविण्यासाठी. एकुलत्या मुलाच्या मृत्यूनंतर भाईलाल आणि मधुबेन खूप खचून गेले आहेत आणि भावनिक हतबलता त्यांना पुन्हापुन्हा अपराधीपणाच्या गर्तेत ओढते आहे कारण त्या रात्री त्यांनी गरबा नृत्य बघायला जाणाऱ्या जयेशला जेवणासाठी पुरेसा आग्रह करून अजून थांबवून घेतले नाही. कुठल्याही परिस्थितीत पटेलांच्या अवास्तव जातिभिमानाला दोष देण्यात त्यांना अर्थ वाटतं नाही, जाती व्यवस्थेला तर दूरचं. हि विचारसरणी पुन्हा त्यांच्याचवर जयेशला गरबा नृत्यास जाण्यापासून परावृत्त न केल्याबद्दल जबाबदार ठरवते. आपल्या मुलामागे राहीलेल्या प्रचंड पोकळीबरोबरच त्यात त्याला त्या रात्री ना थांबविल्याबद्दल स्वतःला लावून घेतलेलं दूषण त्यांच्या अंगावर आहे. जातीव्यवस्था इतकी आतपर्यंत रुतुन भिनलेली आहे कि ती व्यवस्था उलथून टाकण्याची शक्यता आणि आशाच उरतं नाही. जातींच्या भिंतींशिवाय उभारलेली समाज व्यवस्थाच आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर बांधून ठेवलेली आहे. त्यामुळे, आहे ती परिस्तिथी स्वीकारून आम्ही त्यातल्या त्यात सुरक्षित जागा शोधावी?

Jayesh’s family was one of the poorest of the Parmar community who live in the vankarvas locality of the village. They had never interacted with the accused before. The families are financially doing well and primarily do farming. Yet there are very few who continue education after high school or higher secondary school.
वनकारवास वस्तीमध्ये राहणाऱ्या परमार समाजातील सर्वांत गरीब कुटुंब जयेशचं होत. आरोपीशीही त्यांचा ह्यापूर्वी कधी संबंधही आलेला नव्हता. बहुतेक कुटुंबे आर्थिकरित्या सक्षम आहेत आणि प्रामुख्याने शेती करतात. तरीदेखील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेपलीकडे मोजक्यांनीच पाऊल टाकता आले आहे.

In 2002, apparently the community was attacked and families were displaced. There has been a history of caste tension and caste violence in the village. Jayesh’s death is simply one of the resultant peaks. The community is now guarded by a strong tall concrete wall compound from the outside, possibly a funded construction. The community has a lot to lose. They are financially settled and naturally have no intentions to attract high scale and destructive violence. Yet, they want to fight for justice and they want to avoid violence.
२००२ मध्ये परमार वस्तीवर हल्ला झालेला आणि कुटुंबे विस्थापित झाली होती. जातीय तणावचे आणि जातीय हिंसाचाराचे गालबोट गावाला पूर्वीपासूनच आहे. जयेशच्या मृत्यूची घटना हि ह्या हिंसाचाराच्या तणावातल्या वरच्या टोकांपैकी एक आहे. गावापासून तशीही दूर असलेली वस्ती सध्या नवीन बांधलेल्या उंच कॉंक्रिट भिंतीआड आहे. परमार वस्तीला गमावण्यासारखे बरेच आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत आणि नैसर्गिकपणे त्यांना पुन्हा मोठ्या हिंसाचाराला आणि विध्वंसाला बळी पडण्याच्या हेतू नाही. तरीही त्यांची अहिंसकपणे आणि अविरतपणे न्यायासाठी लढाई चालू आहे.

//



An RTI application demanding transparency about the about the sanction allocations to the Gram panchayat of his village, Nanjibhai Sondharva, a 35-year old Dalit Youth from Manekwada Village in Kotda-Sanghani block, attracted the fury of the upper caste Darbars who form the majority in the gram panchayat. On the day of Diwali in 2016, 70 Darbars broke the doors and attacked Nanjibhai’s house as he was contesting in the Gram Panchayat Election. In the attack, his father’s shoulder was brutally hacked by a sword and his wife Meghabai was dragged out of the house and sexually harassed. Months later, in another planned attack, Nanjibhai was clubbed to death by iron pipes. Meghabai proudly continues to carry the immense legacy of the her husband’s tenacity and tenderness as she pursues the relentless fights her husband had started. Yet, Meghabai has no place to hide the grief caused by the loss of her affectionate and resilient man.
माहितीच्या अधिकाराचा अर्ज भरून ग्राम पंचायतीत मंजूर झालेल्या कार्यवाटपात पारदर्शकतेची मागणी करणारे, नानजीभाई सोंधर्वा. कोतडा-संघानी तालुक्यातील मानेकवडा गावातील ह्या एक पस्तीस वर्षीय दलित युवकाने सवर्ण दरबार जातीच्या लोकांचा, ज्यांचे ग्राम पंचायतीत बहुमत होते, त्यांचा रोष ओढवून घेतला. ग्राम पंचायत निवडणुकीस उभा राहिलास म्हणून जवळपास ७० दरबाऱ्यांनी नानजीभाईच्या घराचे दरवाजे तोडून २०१६च्या दिवाळीत हल्ला केला होता. त्या हल्ल्यात, नानजीभाईंच्या वडिलांच्या खांद्याला तलवारीने गंभीर दुखापत करण्यात आली होती आणि पत्नी मेघाबाईस घराबाहेर खेचून विनयभंग केला. काही महिन्यानंतर, आणखी एका नियोजित हल्ल्यात नानजीभाईला लोखंडीपाइपांनी ठेचून मारण्यात आले. आपल्या पतीने चालवलेला अदम्य लढाऊबाणा मेघाबाई पतीच्या चिकाटी आणि मृदुलतेचा अफाट वारश्यासह आजही अभिमानाने पुढे चालवत आहे. तरीही, मेघाबाईकडे आपला प्रेमळ आणि अभिमानी नवरा गमावल्याचे दुःख लपवायला कुठेही जागा नाही.

//


Mahesh is young teenager who is very particular about the way he wears his hair and his choices of shirts. Below a his stylish and soiled jeans he puts on a pair of mojdi. One cannot help but notice his mojdi, the most beautiful and graceful part of his attire. A very simple boy, who has had quit school after seventh standard and works as a wedding musician with his father in the village. He has elegantly walked out of a very humiliating experience and still carries his grace with the same ease which put him through that humiliating experience in the first place. Mahesh Rathod, a 13-year old Dalit boy from Vithalapur Village, Mehsana district was brutally beaten up for wearing a gold-chain and mojdi. Soon, the a video of the upper caste boys abusing and slapping Mahesh, forcing him to state that he is a dalit and can never become a Rajput by wearing mojids, went viral on social media. Mahesh is a confident young boy who carries a very different understanding of the world from his parents, a young boy who knows that the world is lot bigger and wider than his parents like to assume. He has no intention to revisit his experience in a capacity of a victim, but instead, successfully sustains his poise without any scars.

किशोरवयीन महेश आपल्या केसांच्या स्टाईलबद्दल आणि शर्टांच्या चॉईसबद्दल खूप चोख असतो. त्याच्या  मातीत भिजलेल्या आणि तरीही फॅशनेबल जीन्सखाली तो मोजड्यांची एक जोडी चढवतो. त्याची मोजडी तुमच्या नजरेतून सुटायचीच नाही, त्याचा पोषकतला सगळ्यात सुंदर आणि मोहक हिस्सा. महेश स्वभावाने तसा खूप साधा. सातवीनंतर शाळा सुटल्यावर आता तो वडिलांच्या बरोबरीने लग्नात ढोल वाजविण्याचा परंपरागत व्यवसाय करतो. अतिशय अपमानास्पद अनुभवाला सुसभ्यतेने मागे सोडून त्याच नजाकतीत तो अतिशय सहजपणाने आजही चालतो ज्याची शिक्षा म्हणून त्याला त्या अपमानास्पद अनुभवाला तोंड द्यावे लागले होते. महेश राठोड,मेहसाणा जिल्ह्यातील विठलापूर गावामधला एक १३ वर्षीय दलित मुलगा, ज्याला पायांत मोजडी आणि गळ्यात सोन्याची चेन घातली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर लवकरच त्या सवर्ण मुलांकडून महेशला शिवीगाळ आणि मारहाण होत असलेला विडिओ, ज्यात त्याच्याकडून जबरदस्तीने ‘मी दलित आहे आणि मी मोजड्या घालून कधीही राजपूत बनू शकणार नाही'असे वदवून घेतलेला विडिओ व्हायरल झाला. महेश खरतर एक स्वाभिमानी मुलगा आहे ज्याची जगाकडे बघण्याची दृष्टी त्याच्या आईवडीलांपासून बरीच भिन्न आहे. आपल्या आईवडिलांना वाटतो त्यापेक्षा जगाचा परीघ बराच रुंद आहे ह्याची जाणीव महेशला आहे. स्वतःवर घडलेल्या प्रकाराची आठवण स्वतःकडे दयाळभूत नजरेने ठेवण्यात त्याला कसलेही स्वारस्य नाही, किंबहुना, कुठल्याही खुणांशिवाय त्याच्या ऐटीतली सहजता तशीच टिकून आहे.

//


Jaidev, an 18-year old Dalit boy works at an automobile factory in Becharaji city, had saved up his annual salary to by a bike, Yamaha YZF R15. The arrow-head shaped air vent between the LED lamps up front makes for an aggressive face along with the sleek headlamps. To complement with that, Jaidev decided to put a sticker of Shivaji with a moustache on his bike. Jaidev’s slender body now trembles as he poses for a photograph sitting astride on his racing blue machine and enunciates how he started receiving threats from the upper caste community of his village after putting a sticker of Shivaji with moustache on his bike. Jaidev Parmar is a member of Harijan community from the Akbaa village in Mehsana and was brutally thrashed in his own house by a mob of 10 to 15 upper caste people when all their attempts  to make him sell his bike went to vein. Jaidev is loved and supported by a very cohesive community. The fact that the upper castes accuse him of trying to be a Rajput itself appears as a convenient denial that the Harijan community is actually self-content and proud of icons like Dr. Ambedkar and Sant Rohidas.
जयदेव ह्या १८ वर्षांचा दलित मुलाने बेचरजी शहरातल्या ऑटोमोबाइल फॅक्टरीमधल्या आपल्या वर्षभाराची कमाई जमवून स्वतःसाठी बाईक, ती पण यामाहा वाय-झेड-एफ आर-फिफ्टीन!  त्या चमकदार हेडलॅम्प् च्या दोहोबाजूंनी असलेल्या एल-इ-डी च्या मधोमध एक बाणाकृती खोच आहे एअर वेन्टची, ज्याने जणूकाही ती बाईक चिडलेल्या चेहऱ्याचा आव आणते. ह्यालाच जोड म्हणून कि काय, जयदेवने निळ्या टिळ्यासह शिवाजीचं स्टिकर लावलंय आपल्या विंड शिल्डला. आपल्या निळ्या रेसिंग मशीनवर मांड टाकून मिशीवाल्या शिवाजीचं स्टिकर गाडीला लावल्याबद्दल येणाऱ्या धमक्यांविषयी सांगताना आणि फोटोसाठी पोज देताना जयदेवचं सडपातळ शरीर आज थरथरत होत. मेहसाणा जिल्हयातल्या अकबा गावातल्या हरिजन समाजाच्या जयदेव परमारला त्याची बाईक विकून लावण्यास भाग पाडण्यासाठी दिलेल्या धमक्या वाया गेल्याने त्याच्याच घरात घुसून दहा ते पंधरा सवर्णांच्या जमावाने घरात घुसून अनिर्दय मारहाण केली. जयदेवची प्रेमळवस्ती समर्थपणे जयदेवच्या पाठीशी आहे. खरे पाहता, सवर्णांकडून त्याच्यावर होत असेलेला राजपूतांसारखं वागण्याच्या बिनबुडाचा आरोप त्याच्या हरिजन समाजाच्या आत्म-समर्थतेला आणि डॉ. आंबेडकर, संत रोहिदास सारख्या व्यक्तिमत्त्वांचा त्यांना असलेला अभिमान नाकबूल करण्यासाठी केला जातो.


//
Hacked to death for owning and riding a horse


Pradeepbhai Kalubhai Rothod, a 21-year old dalit youth, was hacked to death on 29th March 2018, allegedly by three men from the Rajput community. According to the police and local residents, Pradeep owned and rode a horse, which led to his brutal death. A youth who enjoyed his own practice of expressing his self-esteem and his benign ideas of machismo borrowed from the ideals of his surroundings is a representative of a typical dalit youth who is experiencing a landslide transition in the the amount of confidence his generation carries. Pradeep’s father, Kalubhai, has earnestly erected a concrete structure which houses his family of four. In Timbi village of Umrala Taluk of Bhavnagar District in Gujarat, the house is a half finished typical modern urban Indian structure with its own grace and progression. The male members of the household and the community are mourning in the unfinished part of the house, browsing through the Pradeep’s photographs in their mobile phones. Pradeep has had personally documented his persona and his affection for the horse very well in the digital times. His poise is a natural blend of denim wearing handsome dalit boy on a horse, a traditional mode of pride expression. A digital flex of one of his pictures is leaning on a concrete column, in which Pradeep is sitting astride on the horse in a royal stance. Holding his childhood photograph in his hands, in which Pradeep was again groomed on a horse, his father remembers treating Pradeep always like a prince. His mother was distinctly grieving alone sitting away from the male members of the meeting.
प्रदीपभाई कालुभाई राठोड, ह्या २१ वर्षीय दलित तरुणाचा २९ मार्च २०१८ ला कथितपणे तीन राजपूत समाजाच्या माणसांकडून भोसकून खून करण्यात आला होता. पोलीस आणि स्थानिक रहिवाश्यानुसार जे त्याच्या हत्येचे कारण प्रदीप त्याकडे असलेल्या घोड्यावर फिरायचा. एक तरुण, त्याच्याच आजूबाजूच्या पौरुषत्वाच्या कल्पना ज्या त्याला जातीमुळे वर्ज्य होत्या, त्यातून आज मुक्तपणे स्वसन्मान व्यक्त करु पाहतो, हे आजच्या ठराविक दलित युवकाच्या पिढीच्या आमूलाग्रतेने आलेल्या आत्मविश्वासाचे एक उदाहरण आहे. प्रदीपचे वडील, कालुभाई, ह्यांनी आपल्या चार जणांच्या छोट्या कुटुंबासाठी मेहनतीने उभ्या केलेल्या काँक्रीटच्या बांधकामात राहतात. भावनगर जिल्ह्यातील उमरला तालुक्यातील तिंबी गावातील हे अर्धवट बांधलेल हे ठराविक आधुनिक शहरी धाटणीचं बांधकाम त्याच्या मनस्वीपणात उभे आहे. मोबाईल फोनवर प्रदीपचे जुने फोटोज बघत, घरातील आणि समाजातील सर्व पुरुष, अर्धवट बांधून झालेल्या भागात एकत्र शोकाकुल बसले आहेत. मोबाईलवर प्रदीपने त्याचे आणि त्याच्या घोड्याचे अनेक फोटो काढून त्याच्या खूप आठवणी आणि व्यक्तिमत्त्व रेकॉर्ड करून ठेवलं होत. डेनिम घातलेला देखणा दलित तरुण ऐटीत घोडयावर बसला आहे असा प्रदीपचा थाट होता. घोड्यावर राजेशाही बैठकीत आडवा बसलेल्या प्रदीपच्या फोटोचा एक मोठा फ्लेक्स कॉंक्रिटला टेकून उभा आहे. नेहमीच राजकुमारसारखा वागवलेल्या प्रदीपच्या आठवणीत त्याचे वडील हातातल्या फोनमध्ये प्रदीपच्या लहानपणचा फोटो बघत आहेत, ज्यात प्रदीप पुन्हा एका घोड्यावर सजून बसला होता. प्रदीपची आई मात्र दुर आतमध्ये एकटीच बसून हळहळत होती.

Owning and riding a horse has seen as an exclusive practice of Rajput Caste from Saurashtra. This exclusivity has everything to do with maintaining the century old social hierarchies and power equations of inequality. The boyish swag in Pradeep ignored and implicitly challenged the caste norms and had decided to own and ride a horse. Pradeep’s family tried to negotiate with the 10th class drop out youth, who had been working at the small three bigha family farm of cotton to support his family, to instead settle upon Bullet, a cruiser motorbike, another expensive power symbol in the rural India. Despite of the repetitive death threats from the accused, Pradeep’s stubborn nature was adamant on keeping the horse, owing to a his childhood dream and sincere affection for riding a horse. His horse, which the family could not easily afford, was bought eight months ago and affectionately named Raju. Pradeep’s father, Kalu, alleges that the accused hatched a conspiracy on March 29th and murdered his son.
सौराष्ट्रात घोडा पाळणे आणि घोडेस्वारी करणे हि केवळ राजपुतांची मक्तेदारी समजली जात असे. सामाजिक सामर्थ्यातील असमानता आणि जातीय उतरंड टिकवून ठेवण्यासाठीच केवळ ह्या मक्केदारीचा उद्देश होता. प्रदीपच्या पोरकट स्वैगने जातीय बंधने दुर्लक्षून आणि त्यातून नकळतपणे त्या बंधनांना आव्हान देऊन, घोडा पाळायचा आणि घोडेस्वारी करायचे ठरवून घेतले होते. दहावीत नापास झाल्यानंतर घराच्या तीन बिघा जमिनीतल्या कापसाच्या शेतीमध्ये हातभार लावणाऱ्या प्रदीपशी घरच्यांनी खरतर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करून घोड्याऐवजी बुलेट बाईक सुचवून पहिली होती, जी कि ग्रामीण भारताचा दुसरा आणि आधुनिक पॉवर सिम्बॉल आहे. आरोपींकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असतानादेखील प्रदीपचं हट्टी स्वभाव घोडा ठेवण्यावर अडून राहिला. शेवटी त्याच घोड्यांवर नितांत प्रेम आणि घोडा पाळण्याची लहानपानापासूनचं स्वप्न होत. त्याचा अतिशय महागडा न परवडण्याजोगा घोडा आठ महिन्यापूर्वी विकत घेऊन त्याच ‘राजू’ असं त्याने नामकरणहि केलं होत. प्रदीपचे वडील, कालू, ह्याच्या आरोपानुसार कट रचून त्यांच्या मुलाची २९ मार्चला हत्या करण्यात आली होती.

According to the local police, the incident took place between 6 pm and 7 pm when Pradeep was on his way home from the farm. Pradeep’s father, Kalu Rathod, in his complaint said, “Pradeep left for home on horseback while my elder son Rakesh and I stayed back to milk our cow. But when Rakesh and I reached home on our bike, my wife informed us that Pradeep had not reached. Initially, we thought he might be with his friends. But when he did not return till dinner time, Rakesh dialled his number and the calls went unanswered.” After that, states the complaint, Kalu and Rakesh launched a search for Rathod. “While we were on the road to Keriya village, we spotted three motorcycles coming from the opposite direction. Two of them, with two riders each, took a different road, and the third came towards us. When we asked if he had seen a youth on horseback, he told us he had seen a man lying dead near a check-dam at some distance,” it states. According to police, Kalu and Rakesh found Rathod lying in a pool of blood, with deep wounds and cuts on his head, throat and right hand. He was rushed to a government hospital in Umrala where he was declared brought dead.
स्थानिक पोलिसांनुसार घटना संध्याकाळी ६ ते ७च्या दरम्यान घडली, जेव्हा प्रदीप त्याच्या शेतातून घोड्यावरून घरी परत जात होता. प्रदीपचे वडील, कालू राठोड, ह्यांनी फिर्यादीत म्हंटल्या प्रमाणे, 'प्रदीप घोड्यावरून घराकडे निघाला आणि माझा मोठा मुलगा राकेश आणि मी गाईचे दूध काढण्यासाठी मागे थांबलो. पण जेव्हा राकेश आणि मी मागून बाईकने घरी पोहोचलो, तेव्हा माझ्या पत्नीने सांगितले कि प्रेडिप अजून घरी पोहोचलाच नाही. सुरुवातीला आम्हाला वाटले कि तो त्याच्या मित्रांबरोबर असेल. पण तो रात्रीच्या जेवणाच्या वेळीही परतला नाही आणि राकेशने त्याला फोन लावले आणि कुठलेही कॉल उचलेला गेला नाही.’ त्यानंतर फिर्यादीनुसार कालू आणि राकेश प्रदीपचा शोध घ्यायला लागले. “जेव्हा आम्ही केरिया गावाच्या रस्त्यावर होतो, आम्ही तीन मोटारसायकली आमच्या दिशेने येताना पहिल्या. त्यातल्या दोन गाड्यांनी,ज्यावर प्रत्येकी दोन लोक बसलेले होते, वेगळा रस्ता घेतला आणि तिसरी गाडी आमच्याकडे आली. जेव्हा आम्ही त्याला विचारले कि कोणी घोड्यावर तरुण मुलगा पाहिलास का, तर त्याने आम्हला सांगितले कि थोड्या दूरवर चेक डॅम जवळ एक माणूस मरून पडलेला आहे.” पोलिसांनि सांगितल्यानुसार कालू आणि राकेशला प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात डोक्यात, गेल्यावर आणि उजव्या हातावर खोल जखमा आणि वारांसह सापडला. त्याला उमरळ्याच्या सरकारी इस्पितळात नेईपर्यंत  त्यास मृत घोषित करण्यात आले होते.

While day following the funeral witnessed a nearly deserted village with armed state police outside Rathod residence, creating an impression of a tensed curfew like appearance in Timbi Village, the Rothods were mournfully attempting to accept the sudden loss of their younger son, placing a photograph of his charming youth next to his framed innocent childhood.
अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच शिवाशी सर्व गाव शुकशुकाटले होते आणि राज्य पोलीस दल राठोडांच्या घराबाहेर उभे होते. संचारबंदीचा भास व्हावा अश्या तिंबी गावातील तणावपूर्ण वातावरणात शोकाकुल राठोड कुटुंबीय अचानक गमावलेल्या आपल्या मुलाच्या आनंदी तारुण्याचे आणि निरागस बालपनाचे फोटो शेजारी मांडून होते.

The sense of pride and delight Pradeep carried riding Raju and the challenges he made to the social exclusivity of power symbols had reportedly irked the members of Rajput community. The intolerance smothering within the Rajput Community and Pradeep’s consistent practice of his natural princely persona apparently further sprouted the seeds of hate in Darbari Community. The hate is seemed to be primarily rooted in the Rajput Community’s own feelings of inadequacy and insecurity. The fact that Pradeep’s family worships the very same gods with those of the accused, stays completely irrelevant. Timbi village has a population of around 5000. The villages is dominated by Patidars, with about 50 Dalit families making the community the second largest group. Notably, there are only around a dozen Rajput families in the village. The cognitive dissonance of the Rajput is known to bud from the glorified history and miserable present. The sense of resentment within the Darbari community is said to flame upon the dalit social mobility and its own entitlement to the exclusivity of social resources.
ज्या दिमाखाने आणि उत्साहाने प्रदीप राजूसोबत घोडेस्वारी करायचा आणि ज्या पद्धतीने शक्तीचिन्हांवर असलेली काही उच्च सामाजिक गटांच्या मक्तेदारीला त्याने आव्हान दिले होते, त्याने राजपूत समाजातील लोक उसकटले गेले असे बोलले जाते. राजपूत समजतात धुमसत असलेला असंतोष आणि प्रदीपची राजकुमारासारखे उपजत नेहमीचे वावरणे ह्यांनी दरबारी जातीतल्या द्वेशाच्या बीजाला कोंब फुटायला सुरुवात झाली होती. ह्या द्वेषाचे खरे मूळ मात्र राजपूत समाजाच्या स्वतःच्या अपुरेपणात आणि असुरक्षितेत होते. प्रदीप आणि आरोपींचे कुटुंब एकाच देवासमोर नतमस्तक होतात हे मात्र संपूर्णतः अप्रासंगिग ठरते. टिम्बी गावाची लोकसंख्या जवळपास ५००० आहे. पाटीदारांचं गावावर वर्चस्व आहे आणि जवळपास ५० घरांची दलित वस्ती हा गावातला दुसरा सगळ्यांत मोठा वर्ग आहे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे केवळ डझनभर घरे हि राजपुतांची आहेत. राजपुतांचा गौरवांकित इतिहास आणि त्यांची सध्याची असमाधानकारक परिस्थिती ह्यांत ताळमेळ लागत नसल्याने गोंधळून खवळलेला आहे. दरबारी समाजातील चीड हि दलितांच्या प्रगतीमुळे जळफळून दरबाऱ्यांच्या स्वतःच्या हटवादी एकजिनसी हक्क्यांच्या भावनेतून उफाळलेली आहे असे बोलले जात आहे.
 

//



Revisiting the Sarvaiya family affected in Una flogging

July 11, 2018 marked the two-year anniversary of the Una flogging case, a barbaric episode of caste-based violence that rattled the entire nation to the core of its wrongdoing.

The Sarvaiyas, a community belonging to the Dalit section of a Rajput-dominated society, were brutally thrashed in the Una Town in the Saurashtra region of Gujarat.

The family whose primary occupation was to pick-up and dispose dead cattle, got a call in the morning  to skin a dead cow, 3 km away from their village Mota Samadhiyala. Balubhai Sarvaiya left the job to his two sons Ramesh and Vasram and his two nephews Ashok and Bechar. The group was soon stormed by a band of cow vigilantes claiming that they killed the cow and started beating them up. Balubhai’s wife, Kunwar and the owner of the cow Devarshi Banu were also thrashed.

After the incident, Balubhai and his community quit skinning cows for a living and started working as labourers. Later that year, they also renounced the religion because of which they were discriminated upon and converted to Buddhism.



//



Kidnapped and raped for rejecting an upper caste boy

In October 2016, Priya was stalked by an upper caste boy for almost a year. Not willing to accept her rejection, he came to the house, kidnapped and raped her. The very same night, the family fled the village leaving all their belongings behind. Until today, neither Priya nor her father, who was thrashed brutally by the boy’s friends, have recovered from the tragic incident.

//

August 2018