︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.




//
As the 2020 pandemic began, the unavoidable lockdown that followed brought a very obvious shade of gloom in the monotonic daily life. The sense of loneliness and anxiety was too palpable to seamlessly keep evading every single day. To both balm and trace over that loneliness and anxiety, I wanted to miss my old friends when I wasn't actually missing them. Loneliness, craving a company and missing a community are all very different, complex and incoherent emotions and I felt they need not be simplified into one single experience all the time.

These photos don't actually exist on the walls of my parental home. I made hyper-realistic photoshoped renderings of my old friends on pictures of these walls. During the pandemic, my loneliness was real and grievous, but the remedy felt phony and comic. I panicked and abandoned this solitary digital performance, when I realized I have been unjustly morphing my memory into a certain kind of nostalgia to feed my current emotional demands.

//
२०२०वाल्या पँडेमिकमध्ये जे अनिवार्य लॉकडाऊन झाले, त्यात रोजच्या आयुष्यात एकटेपणाची आणि अस्वथतेची छाया दाटून आली होती. एकाकीपणाची आणि अस्वस्थपणाची साचत जाणारी भावना रोज तेवढ्याच सहजतेने टाळता येणे मुश्किल होत होते. आणि ह्यावर इलाज म्हणून एकट्यानेच रचलेल्या ह्या नाट्यात जुन्या मित्र-मैत्रिणींच्या आठवणी त्यांची आठवण येत नसतानाही मुद्दामहुन गिरवत होतो. एकाकीपणा, सहवासाची इर्षा आणि जुन्या आठवणी ह्या खरं तर एकमेकांपासून भिन्न, क्लिष्ट आणि असंबद्ध भावना आहेत, उगाच दरवेळी त्यांना एका पठडीत बांधून सोपं करून ठेवण्यात अर्थ नाही असं वाटतं होतं.


ह्यापैकी कुठलेच फोटोज खरंतर माझ्या आईवडिलांच्या घरी मी चिटकवलेले नाहीत. त्या भिंतींच्या फोटोंवर माझ्या मित्रपरिवाराची हि बारकाईने घडवलेली एक फोटोशॉप प्रस्तुती आहे. पँडेमिक चालू असतानाचा एकाकीपणा एवढा बेधडक आणि क्लेशकारक होईल हा अंदाज नव्हता. परंतु त्यावरचा हा मलम असा खोटारडा आणि विनोदी भासेल असेही वाटले नव्हते. अशातच जेव्हा जुन्या आठवणींचं मी सध्याच्या मानसिक गरजेपोटी भावनांतरण करत आहे हे माझ्या लक्षात आले, तेव्हा घाबरून जाऊन एकट्याचे हे डिजिटल नाटक मी इथेच अर्धवट सोडले आहे.



March 2020 - September 2020