︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.



//
Photographing my parents has been a private experience for me. It has helped me feel my vision consciously. That experience has allowed a serendipitous exchange between the act of taking their photographs and the act of reflecting on my vision. The photographs had helped me bridge the way my parents behave around me and the way I see them. Initially, I started taking their pictures with an intention to record my mother’s recovery from schizophrenia and my father’s recovery from long term depression. Although, the act of photographing them has mostly been helping me to visually articulate and re-establish the emotional intimacy in my relationship with them.


Now in hindsight, I realized the story in this photo book - which is about our dramatic familial responses to my career choice as a visual artist -  somehow shares a pattern that is the greatest common factor  with all the bigger and smaller anxieties and traumas in my family. Cyclic and spiral nature of the growth and healing became unexpectedly evident through the pages of this book.



//
आईवडिलांचे फोटोज काढणे तशी माझ्यासाठी खूप व्यक्तीगत गोष्ट आहे. पण फोटो काढण्याच्या त्या निमित्ताने मला स्वतःची ‘नजर’ उमजायला लागली. स्वतःच्या मनाची झापडं आणि काढलेले फोटोज ह्यांची नकळतपणेच पडताळणी होऊ लागली. माझ्याभोवतीचे माझे आई-वडील आणि मला दिसणारे माझे आई-वडील ह्यांच्यातला दुवा म्हणून मला ते फोटोज कामी येऊ लागले. सुरुवातीला मला वाटलेलं कि आईची स्कीझोफ्रेनियातुन आणि पप्पांची दीर्घ नैराश्यातून होणारी सुधारणा मी 'डॉक्युमेन्ट’ करत आहे. खरं तर त्या फोटो काढण्यांतून मला आमचं डळमळलेलं नातं समजण्यासाठी-जुळवण्यासाठी भावनिक भाषा सापडत जात आहे.



आता हे फोटोपुस्तक बनून झाल्यानंतर त्याला पुन्हा चाळून बघताना माझ्या लक्षात येते आहे कि, ह्यात जि कथा आहे - माझ्या छायाकलाकार होण्याच्या निर्णयाबद्दल आमच्या कुटुंबात जे पडसाद उमटले त्याची - त्यात खरंतर आमच्या बाकीच्या कौटुंबिक इतिहासात बरं-वाईट लहान-मोठं जे काही घडलं, त्या सगळ्यांचा मसावि आहे. जि काही चक्राकार आवर्तनं होत असतात कुठल्याही गतीत आणि समेटिमध्ये,  ती सगळी ह्या पुस्तकाच्या पानांतून अचानक अनपेक्षितरित्या दिसून यायला लागली. 







July 2018 - November 2019